महाराष्ट्र शासनाच्या कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेअंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र साखरपा येथे मोबाईल व्हॅनचे स्वागत,पालकमंत्री उदयजी सामंत आणि आमदार भैयाशेठ सामंत यांचे ग्रामस्थांनी मानले आभार…

Spread the love

साखरपा- महाराष्ट्र शासनाच्या कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेअंतर्गत मंगळवारी आरोग्यवर्धिनी केंद्र साखरपा येथे मोबाईल व्हॅनचे स्वागत करण्यात आले.

सदर तपासणी मोहिमेचा शुभारंभ माजी पंचायत समिती सभापती माननीय जयाशेठ माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कोंडगाव ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच श्रीमती श्रद्धा शेट्ये यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. सदर कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बापू शेटे, साखरपा माजी उपसरपंच ओंकार कोलते, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गोविंद मोरे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर साळुंखे , दंतचिकित्सक डॉक्टर रुपाली नाईक , कॉर्डिनेटर डॉक्टर प्रसादे  तसेच साखरपा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृणाली पाटील, डॉक्टर सृष्टी डोर्ले आणि तपासणी पथक व कर्मचारी वृंद उपस्थित होते .

यावेळी डॉक्टर साळुंखे यांनी कर्करोगाची  तपासणी का करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच बापू शेट्ये यांनी शासनाच्या या मोफत योजनेचा निरोगी आयुष्यासाठी तपासणी करून फायदा करून घ्यावा असे सांगितले.

मा. जयाशेठ माने यांनी मा. पालकमंत्री नामदार उदयजी सामंत आणि मा. आमदार भैयाशेठ सामंत यांनी ही सेवा जनतेसाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल विशेष आभार मानले व आलेल्या व्हॅनचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा व होणाऱ्या कर्करोगापासून वेळीच सावध होऊन आरोग्य निरोगी राहावे यासाठी याचा फायदा करून घ्यावा असे सांगितले. डॉक्टर गोविंद मोरे यांनी हा शासनाचा कार्यक्रम असून तालुक्यामधील फक्त एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हा कार्यक्रम होत आहे त्याचा जास्तीत जास्त जनतेने फायदा करून घ्यावा असे सांगितले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये  यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाच्या आभार प्रसंगी डॉक्टर सृष्टी डोर्ले यांनी कर्करोगाची तपासणी कशी महत्त्वाची आहे हे विशद करून सर्वांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा व देवळे येथील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन 94 लाभार्थ्यांचे तपासणी करून घेतले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page