महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता ठाण्यातील गडकरी रंगायथन इथे सभा होणार आहे. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात साजरा केला जाणार आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, तत्पूर्वी मनसेकडून नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माण सज्ज! अशा आशयाचे पोस्टर ट्वीट करण्यात आलं असून टीझरदेखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.