
ठाणे: जिल्हा नियोजन समिती जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागाच्या विकासासाठी महत्वाची असते. या बैठकीच्या माध्यमातून आम्ही लोकप्रतिनिधी विविध विकासकामांचे प्रस्ताव मांडत असतो. मात्र सध्या ठाणे जिल्ह्यात असे होताना दिसून येत नाही. मागील वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केवळ दोन वेळेस नियोजन समितीच्या बैठका घेतल्या आहेत. यामुळे आमच्या विकास कामांच्या प्रस्तावांचा आढावा कसा घ्यायचा हा प्रश्न आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री हा स्थानिक लोक-प्रतिनिधीच हवा. स्थानिक पालकमंत्री असल्यास त्यांना भौगोलिक जाण असते. यामुळे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री बदलायला हवा. अशी थेट मागणी कल्याण ग्रामीण मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
जाहिरात

जाहिरात
