रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील काही रिक्षाचालकांकडून अवाजवी भाडेआकारणी व शेयर रिक्षांमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे यासंदर्भातील आलेल्या जनतेच्या अनेक तक्रारीच्या पाश्र्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी साहेब यांना निवेदन देवून सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी मा. पोलिस अधिक्षक कार्यालयांकडून तातडीने प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांच्याशी बैठक आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरच मीटरप्रमाणे भाडेआकारणी करण्यात येवून सर्व गैरप्रकार रोखण्यासाठी मा. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसमवेत उद्या दिनांक १ मार्च २०२३ रोजी बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याप्रसंगी रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष श्री. राजू पाचकुडे, रस्ते आस्थापना उपजिल्हासंघटक श्री. अशोक नाचणकर, विभागअध्यक्ष श्री. अखिल शाहू, श्री. जयेश फणसेकर, श्री. सोम पिलणकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
जाहिरात :