ठाणे- कल्याण स्टेशनवर उभ्या असणाऱ्या एका माथेफिरूने सकाळी कामावर जाणाऱ्या तरूणीची भर गर्दीमध्ये छेड काढल्याची घटना समोर आली आहे.सदर घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून मनसे घडलेल्या घटनेवरून चांगलीच आक्रमक झाली आहे.कल्याण स्टेशनच्या मॅनेजरला घेरून मनसेने सदर घटनेचा निषेध नोंदवला आहे.तसंच मनसेकडून स्टेशन मास्तर यांना बांगड्याची भेट देखील यावेळी देण्यात आली.
दरम्यान सदर माथेफिरूने संबंधित पिडीत तरूणीची छेड काढल्यानंतर तरूणीने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली.हा आरडाओरडा ऐकून आजूबाजूने जाणाऱ्या लोकल प्रवाशांनी संबंधित माथेफिरूला बेदम मारहाणी केली.यानंतर संबंधित माथेफिरूला प्रवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं असून पोलिसांकडून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र,दुसरीकडे अद्यापही स्थानकावर मद्यपी आणि गर्दुल्यांचा वावर सुरूचं आहे.यामुळे तरुणी महिलांची छेडछाड करण्याचे प्रकारही वाढले आहेत.अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिस काय उपाययोजना आखणार हे पाहणं समस्त कल्याणकरांसाठी फायद्याचं ठरणार आहे.