मुंबईत मेलेल्या कोंबड्यांची विक्री, मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले

Spread the love

मुंबई: मुंबईतील हॉटेलांमध्ये बॉयलर कोंबड्यांची विक्री लहान टेम्पोतून केली जाते. यावेळी वाहतुकी दरम्यान अनेक कोंबड्या मरण पावतात. हे टेम्पो दहिसर टोल नाक्याजवळ असेलल्या काशिमीरा उड्डाणपुलाखाली उभे असतात. तेव्हा या मेलेल्या कोंबड्या हॉटेल विक्रेत्यांना स्वस्तात विकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास अश्याच मेलेल्या कोंबड्या घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला मीरा भाईंदर मनसे विभागीय सचिव सचिन जांभळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी मेलेल्या कोंबड्या आपण नाल्यात फेकून देत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. मात्र कुठल्या नाल्यात फेकल्या ते या व्यक्तीला सांगता आले नाही. अधिक चौकशीत या मेलेल्या कोंबड्यांची विक्री मुंबईच्या बांद्रा परिसरातील काही हॉटेल व्यावसायिकांना करत असल्याची कबुली त्याने दिली. ३० रुपयांना एक कोंबडी विकत असल्याचे त्याने सांगितले. या सर्व घटनेची चित्रफीत समाज माध्यमांवर वायरल होत आहे. तर याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे या प्रकरणी तक्रार दिल्याची माहिती जांभळे यांनी दिली.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page