विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सोबत यांच्यासह ठाकरे गटाच्या आमदारांनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट

Spread the love

मुंबई:- विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासोबत ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे. यावेळी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा,अशी विनंती करण्यासाठी ठाकरे गटाच्या आमदारांनी ही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता.यानुसार काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत अपात्रतेबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती निवेदनामार्फत विधानसभा अध्यक्षांकडे केली होती.

यानंतर आज पुन्हा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब, गजानन कीर्तिकर, रवींद्र वायकर, अजय चौधरी यांनी विधान भवनात दाखल होत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी लवकरात लवकर सुनावणी घेऊ असं आश्वासन ठाकरे गटातील आमदारांना अध्यक्षांनी दिले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page