वाशी येथे मोफत उद्योग प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीर संपन्न
संगमेश्वर मधील कुळये वाशी गावाचे उद्योग प्रशिक्षण दिनांक 27 मार्च रोजी वाशी येथे संपन्न झाले. भाजपा प्रदेश सचिव मा.आमदार श्री.प्रमोद जठार यांच्या संकल्पनेतून मोफत उद्योग प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीर जिल्हा उपाध्यक्ष श्री.हरिभाई पटेल व डॉ. जोग यांच्या अथक प्रयत्नाने वाशी सरपंच सौ.तन्वी गानू, श्री.प्रकाश गमरे,श्री.महेश गानू यांच्या सहकार्याने संपन्न झाले. लघुऊद्योग,गृहउद्योग यांच्या निर्माण व्हावेत,या उद्योगाच्या माध्यम्यातून आर्थिक सक्षमता वाढली पाहिजे.नवीन युवा,महिला उद्योजक निर्माण झाले पाहिजेत हा मुख्य उद्देश ठेवून सदर शिबीर आयोजिले होते. सदर शिबिराचे प्रशिक्षण देण्यास संचालक मा.उद्धव शिंदे आलेले होते. या शिबिरामध्ये 50 जणांनी सहभाग घेतला होता त्यापैकी 22 जणांनी उद्योगकृती आवेदन भरण्याचे मान्य केले. या शिबिराचे आयोजक वाशी ग्रामपंचायत आणि सहआयोजक कुळये ग्रामपंचायत यांनी सर्वांचे आभार मानले.
भाजपा सोशल मिडीया संगमेश्वर तालुका