पीक विमा योजनेत भाग घेण्यास ४ व ५ डिसेंबर दोन दिवस वाढीव मुदत वाढ; आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाला यश…

Spread the love

रत्नागिरी- पीक विमा योजनेत आंबा, काजू व संत्रा ही फळपिके आणि रब्बी ज्वारी या पिकांसाठी पीक विमा योजनेत भाग घेण्यास दोन दिवसांची अतिरिक्त (वाढीव) मुदत वाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेता यावा या दृष्टिकोनातून कोकणातील आंबा पीक, सर्व राज्यातील काजू, संत्रा या फळ पिकांसाठी व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी शासनाने ४ व ५ डिसेंबर २०२३ अशी दोन दिवसांची अतिरिक्त (वाढीव) मुदत वाढ मंजूर केली आहे. विमा योजनेला मुदत वाढ मिळावी यासाठी आमदार शेखर निकम यांनी शासनाच्या पातळीवर प्रयत्न केले होते त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

महाराष्ट्र राज्यात विमा योजना अंतर्गत २०२३-२४ मध्ये कोकणातील आंबा आणि सर्व राज्यातील काजू, संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ असा होता. मात्र, पीक विमा पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे काही इच्छुक शेतकरी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले. या शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेता यावा या दृष्टिकोनातून कोकणातील आंबा पीक, सर्व राज्यातील काजू, संत्रा या फळपिकांसाठी व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी ४ व ५ डिसेंबर २०२३ अशी दोन दिवसांची अतिरिक्त (वाढीव) मुदत वाढ मंजूर केली आहे.

कोकणातील आंबा, काजू, संत्रा रब्बी ज्वारी विमा योजनेत भाग घेण्याचा नियमित अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ होती. आता विमा योजनेत भाग घेण्यासाठी वाढीव मुदत ४ व ५ डिसेंबर २०२३ आहे. आता विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले इच्छुक शेतकरी वरील फळ पिकांसाठी ४ व ५ डिसेंबर २०२३ रोजी विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. याचा राज्यातील आंबा, काजू, संत्रा व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. कोकण व्यतिरिक्त राज्यातील उर्वरीत भागातील आंबा फळ पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२३ असा नियमित आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०२३ असा आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page