
चिपळूण : जिल्ह्यातील प्रत्येक भागातील शेतकरी बांधव आजला विविध उत्पादनांसह प्रक्रिया उद्योगांवरही भर देवू लागला आहे. गावागावात महिला बचत गटांनी आपल्या उत्पादन वाढीवरही भर दिला आहे. त्यामुळे कृषी प्रदर्शन व विक्रीच्या माध्यमातून उत्पादक आणि ग्राहकांचा संगम होवून शेतकरी आणि बाजारपेठ मिळण्यास मदत होते, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी केले.
राष्ट्रीय कृषी विकास योजना भात लागवड व गुणवत्ता सुधार प्रकल्पांतर्गत जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण यांच्यावतीने शहरातील कै. अण्णासाहेब खेडेकर क्र्रीडासंकुलात आयोजित जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आणि जिल्हा कृषी अधिकारी सुनंदा कुराडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार निकम बोलत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
भ्रमणध्वनी क्र.९८१९९४६९९९/८९२८६२२४१६