संगमेश्वर, देवरुख-
देवरुख शहरातील देवरुख आगाराचे काही वर्षा पुर्वीच Build Oparate Transfer (BOT) तत्वावर नूतनीकरण करण्यात आले. हे नूतनीकरणाचे काम अपुर्ण स्वरुपात झाले असल्याने सदर इमारत, चालक-वाहक निवास, प्रसाधन गृह यांची पावसाळ्यात छतातून होणारी गळती, चांगल्य कंडीशनमध्ये नसणा-या बस यामुळे बसची कमतरता, प्रवाशांची होणारी गैरसोय याबाबत देवरुख आगार सर्व सोयी-सुविधेने सुसज्ज व्हावे म्हणून “आपलं देवरुख सुंदर देवरुख” ग्रुप कमालीचा प्रयत्नशील आहे तसेच देवरूख बसस्थानक दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा याबाबत मा. विभाग नियंत्रक, राज्य परिवहन रत्नागिरी यांचे निवेदन आमदार शेखर निकम यांना प्राप्त झालेले आहे.
सदर निवेदनाची दखल आमदार शेखर निकम यांनी घेतली आणि “आपलं देवरुख सुंदर देवरुख” या ग्रुपच्या सदस्याच्या माध्यमातून संबंधित अधिकारी यांच्या समवेत देवरुख आगार सोयी-सुविधांबाबत बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक सा. बा. विभाग, देवरुख रेस्ट हाऊस येथे संपन्न झाली..
या बैठकीमध्ये देवरुख आगार प्रसाधनगृह दुरुस्ती व ड्रेनेज लाईन करणे, प्रवाशी शेड छत गळती काढणेसाठी शेड बांधणे, इमारतीच्या पाण्याच्या पाईप लाईनचे नुतनीकरण करणे, चालक-वाहक निवास नूतनीकरण करणे, उर्वरित वाहन तळाचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, तसेच आगारात बसची संख्या कमी असणे व नादुरुस्त असणे, बस वेळेत न सुटणे, पे ॲन्ड पार्क टु-व्हिलर या विषयी सखोल चर्चा करुन या सर्व समस्या पाठपुरावा करुन सोडवण्याविषयी शब्द दिला गेला.
यावेळी मॅकेनिक इंजिनिअर अनंत कुलकर्णी, DOB डिव्हिजन राकेश पवार, स्थापत्त्य अभियंता सुरेश मोहीते, उद्योजक अजय पित्रे, हेमंत तांबे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, प्रफुल्ल भुवड, निखील कोळवणकर, राजू वनकुंद्रे व संबंधित अधिकारी व कार्यकर्ते इ. उपस्थित होते..