नागपूर- नागपूर सुरू असलेल्या महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन २०२३ मध्ये चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री शेखर निकम यानी अनेक समस्या मांडल्या व त्यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली.
🔸️श्री शेखर निकम यानी केलेल्या भाषणातील काही ठळक मागण्या…
▪️संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील सामुहिक सुविधा प्रकल्प लवकरात लवकर कार्यन्वित होणे संदर्भात तातडीने उपाययोजना करण्यात यावी. त्याचप्रमाणे चिपळूण तालुक्यातील मौजे अलोरे येथील शासनाच्या जलसंपदा विभागाने खरेदी केलेल्या जमिनीवर मिनी इंडस्ट्रीची उभारणी व रोजगार केंद्र सुरु करण्यात यावे. मत्स्यपालन, पशुपालन फार्म, रेशीमशेती व मशरुम शेती या घटकांकरीता वापरात असलेले वीज बील “कृषी इतर” ऐवजी “कृषी” या वर्गात करण्यात यावे.
▪️महावितरण कपंनीमध्ये विद्युत सहाय्यक यांची भरती प्रकियेवेळी आय.टी.आय वायरमन किंवा इलेक्ट्रिशियनची भरती, दहावीचे मार्क्स यावर अधारीत न करता आय.टी.आय. गुणांनुसार करण्यात यावी. महावितरण कंपनीअंतर्गत असलेल्या PUBLIC SERCICE कॅटेगरीमधील ग्राहकांचा NSC स्कीममध्ये समावेश करावा. जल जीवन मिशन अंतर्गत 13 व्या राज्यस्तरीय योजनेस SLSE मध्येच मंजूरी देणेत यावी व पाण्यापासून वंचित वाड्यांचे डी.पी.आर. यांना मंजुरी मिळावी.
▪️रत्नागिरी जिल्ह्यात कामगारांसाठी ESIC रुग्णालय होणे. कोकणातील धनगर समाजाचा मुलभूत विकास व पुनर्वसना संदर्भात धोरण होणे.
▪️कोकण व रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असणारे प्रश्न विधानभवनात उपस्थित करीत यांवर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना होण्याबाबत शासनाकडे मागणी केली.