
हरियल फाउंडेशन आणि हरी नमो फाऊंडेशन यांच्या संयुक्तवतीने आयोजन
कॅन्सर, डायबेटीस आणि डोळ्यांच्या विषयक आजारावर तपासणी
संगमेश्वर – दि 30
(मकरंद सुर्वे संगमेश्वर )
डायबेटीस, कॅन्सर आणि डोळ्यांची काळजी आणि इतर आरोग्य विषयक एक दिवसीय शिबिराचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले.
कडवई बाजारपेठ येथे हरियल फाउंडेशन आणि हरी नमो फाऊंडेशन यांच्या संयुक्त वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात आरोग्य विषयक तसेच रोगांविषयी अज्ञान असते. तसेच फारसा सुविधा नसल्याने रोगांचे लगेच निदान होत नाही. हरियल फाउंडेशन आणि हरी नमो फाऊंडेशन यांच्या सदस्यांनी याबाबत जनजागृती रोगांविषयी योग्य निदान करण्यासाठी एकदिवशीय आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये डॉक्टर मिलिंद रुके यांनी डायबिटीस आणि इतर आजार तसेच डॉक्टर प्रशांत केळकर यांनी कॅन्सर विषयक आणि शहानवाझ यांनी डोळ्यांची काळजी आणि विविध आजार या विषयक तपासणी केली. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील रुग्णांनी सहभागीत तपासणी केली शिबिरमध्ये दीडशे रुग्णांनी तपासणी करून घेतले. शिबिरासाठी डॉक्टर मिलिंद रुके आसिफ काझी रिजवान सावंत कडवई ग्रामपंचायत, जमातुल मुस्लमिन, कडवई, आझाद स्पोर्ट्स क्लब, रोजी रोटी फाउंडेशन तसेच स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
डॉक्टरांसाठी मार्गदर्शन शिबिर
ग्रामीण भागात आरोग्य विषयक महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्थानिक डॉक्टरांसाठी हरियल फाउंडेशन आणि हरी नमो फाउंडेशन यांच्यावतीने मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरामध्ये 22 स्थानिक डॉक्टरांनी सहभाग घेतला.
फोटो ओळी – कडवई बाजारपेठ येथे आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना आमदार शेखर निकम यावेळी उपस्थित डॉक्टर प्रशांत केळकर डॉक्टर मिलिंद रुके शहावनाझ काझी,इरफान चिट्टे आदी मान्यवर ( स्वाती फोटो स्टुडिओ, संगमेश्वर)