
चिपळूण- चिपळूण तालुक्यातील पेढांबे गावातील प्रतिष्ठीत नागरीक व सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चिटणीस गजानन सुर्वे यांना सदिच्छा भेट देवून 60 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या व पुढील आयुष्यात सुख समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य आणि आरोग्य तुम्हाला मिळो असे परमेश्वरचरणी प्रार्थना केली. या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधला तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी दशरथ दाभोळकर, अबु ठसाळे, डॉ. अमित तांबडकर, राजू सुर्वे, सुशिल भायजे, शशिकांत घाणेकर, दिपक जाधव, सुरेश कांगणे, अक्षय चव्हाण, गणपत चव्हाण, अमित माचिवले, अजित मोरे, राजेंद्र पोमेंडकर, जाकीर शेकासन, सुलतान कापडी, गुलाब सुर्वे, रुपेश गोताड, सुबोध चव्हाण, महेश बाष्टे, कृष्णा वेलोंडे, वैभव मते, चंद्रकांत वखरकर, उदय पवार, लहु सुर्वे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
