पनवेल – पनवेल विधानसभा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित नमो चषक महोत्सव अंतर्गत कळंबोली येथे भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे.या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि.15) करण्यात आले.यावेळी रायगड विरुद्ध ठाणे संघांत झालेली लढत क्रिकेटप्रेमींचे आकर्षण ठरली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहेत. त्या अंतर्गत 15 ते 25 जानेवारीदरम्यान कळंबोली येथील केएलई कॉलेजच्या मैदानात भव्य टेनिस क्रिकेट दिवस रात्र स्पर्धेचे आयोजन माजी नगरसेवक बबन मुकादम, अमर पाटील, विकास घरत, युवा नेते हॅप्पी सिंग, रामा महानवर, संदीप म्हात्रे, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, प्रशांत खानावकर यांच्या माध्यमातून केले गेले आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र शर्मा, विकास घरत, विजय चिपळेकर,माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर, उत्तर जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक मोटे, चिटणीस संदीप म्हात्रे, कळंबोली मंडळ उपाध्यक्ष संदीप भगत, सुनील ढेबरे, सरचिटणीस दिलीप बिस्ट, प्रभाग अध्यक्ष प्रकाश शेलार, युवा नेते हॅप्पी सिंग,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, प्रकाश महानवर, भाजप नेते देविदास खेडकर, हनुमंत शेळके, आभा घुटूकडे, संदीप भगत, विनोद बोरसे, युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक, सरचिटणीस निशांत गिल, अमर ठाकूर, जमीर शेख, महादेव येरवले, घनश्याम शर्मा, विष्णू गायकवाड, शुभांगी निर्मले, वनिता येरकर, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.