
मुंबई : कोकणातील लोककलेला राजाश्रय मिळाला पाहिजे, यासाठी शासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी खेळे/ नमन, जाखडी या लोककलांना अनुदान व कलाकारांना मानधन मिळालेच पाहिजे. याचे फलक झळकवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सरकार या मागण्यांकडे कितपत लक्ष देते ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोकणातील लोककलाना अनन्य साधारण महत्व आहे. कोकणची लाल माती आणि या लाल माती कलावंतांनी आपल्या कलेतून जतन केलेल्या लोककला आजही रसिकांच्या मनात कायम आहेत. मात्र, या लोककलांना अजूनही राजश्रय मिळालेला नाही. या लोककलांना राजाश्रय मिळावा. यासाठी लोककलावंत व लोकप्रतिनिधी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.