आमदार किरण सामंत यांची वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट..

Spread the love

प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांच्याकडून स्वागत

चिपळूण : राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. किरण उर्फ भैया सामंत यांनी आज सायंकाळी चिपळूण येथील वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्धप्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान आमदार सामंत यांनी डेअरी परिसराची पाहणी करून प्रकल्पाच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.

या प्रसंगी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी आमदार सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले व त्यांना डेअरीच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीविषयी सविस्तर माहिती दिली.

आमदार सामंत यांनी प्रकल्पातील विविध यंत्रणा, दूध प्रक्रिया साखळी, थंड साठवण व वितरण व्यवस्थेची तपशीलवार माहिती घेतली. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-राजापूर भागातून होणाऱ्या दूध संकलन प्रक्रियेबाबत त्यांनी विशेष रस दाखवून संबंधित उत्पादनक्षमतेबाबत चौकशी केली.

या भेटीप्रसंगी उद्योजक सचिन पाकळे, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, उमेश काटकर, विनोद झगडे, प्रसाद लाड, सिद्धेश ब्रिद यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच डेअरीचे संचालक महेश खेतले, अविनाश गुडेकर, प्रशांत वाजे, रमण डांगे, कु. स्वामिनी यादव, गणेश कदम, संदीप पाटील, सरव्यवस्थापक लक्ष्मण खरात, व्यवस्थापक प्रदीप मगदूम व डेअरीतील अधिकारी-कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.

वाशिष्ठी डेअरीच्या या प्रगतीशील उपक्रमाचे आमदार सामंत यांनी कौतुक केले असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देणाऱ्या अशा प्रकल्पांना सरकारकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page