कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा वेंगुर्ले भाजप च्या वतीने सत्कार

Spread the love

कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे आमदार झाल्यावर प्रथमच वेंगुर्ले तालुक्यात आले असता भाजपा तालुका कार्यालयात तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भाजप सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करुन आपल्याच मेहनतीमुळेच मी आमदार झाल्याचे सांगीतले . तसेच वेंगुर्ले तालुक्यातील सर्व शाळांना डिजिटल करण्यासाठी आमदार निधीतून साहीत्य उपलब्ध करून देणार असल्याचे सांगीतले . तसेच पुढील दौर्‍यात वेंगुर्ले तालुक्यातील सर्व हायस्कूल ना भेट देऊन शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कोकण विभागातून मला मिळालेल्या भरघोस मताधिक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा त्यातही वेंगुर्ले तालुक्याचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे तूमचा हक्काचा आमदार म्हणून येथील शिक्षकांच्या ज्या काही समस्या, प्रश्न, कामे असतील ती कामे येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मार्फत आल्यास ती सर्व कामे निश्चित चे पूर्ण करण्यात येतील असे प्रतिपादन कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी येथे केले.
यावेळी रमेश जाधव सर, मुख्याध्यापक संघटना जिल्हाध्यक्ष तर्फे , माजी अध्यक्ष एम. जी. मातोंडकर सर , कुसगावकर सर , एल. आर. पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, महिला तालुकाध्यक्ष स्मिता दामले , श्रेया मयेकर , कृपा मोंडकर , शितल आंगचेकर , साईप्रसाद नाईक , वसंत तांडेल , विजय रेडकर , युुवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , किसान मोर्चाचे बाळू प्रभू , प्रितेश राऊळ , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , रसिका मठकर, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर , आरवली सरपंच तातोबा कुडव , महादेव नाईक , अजित राऊळ सर , वृंदा मोरडेकर , दिंव्यांग आघाडीचे सुनील घाग , नितीश कुडतरकर , रमेश नार्वेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार प्रसन्ना देसाई यांनी मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page