पुणे येथून बेपत्ता झालेल्या महिलेला पोलिसांनी दिले सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात..पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश भागवत हे गस्त घालत असताना आढळली महिला…

Spread the love

दीपक भोसले/संगमेश्वर- हॉस्पिटलमध्ये जाते असे सांगून घरात परत न केलेली महिला गणपतीपुळे या ठिकाणी रात्रीच्या दरम्याने फिरत असताना तिची चौकशी करत पोलिसांनी तिला सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे

धनश्री अशोक चेपटे वय 23 वर्षे राहणार हरपळे वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे येथून ही राहत्या घरातून दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये जाते असे सांगून निघाली होती याबाबत धनश्री अशोक चेपटे यांनी फुरसुंगी पोलीस ठाणे पुणे शहर या ठिकाणी ती बेपत्ता असल्याची खबर दिली होती.

जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश भागवत हे सात नोव्हेंबर रोजी रात्री च्या दरम्याने गस्त घालत असताना गणपतीपुळे मध्ये मुलगी फिरत असताना बघितल्यानंतर तिची विचारपूस केली असता तिने सुरुवातीला विसंगत उत्तर दिले मात्र त्यानंतर विचारल्यानंतर तिने सर्व सर्व हकीगत पोलीस निलेश भागवत यांना सांगितले वरिष्ठ नाही माहिती दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कुलदीप पाटील मिलिंद कदम महिला पोलीस कॉन्स्टेबल सायली गोसले, आदित्य अनकर आधी पोलिसांनी धनश्री चेपटे हिला सुरक्षा देऊन आणि त्याची समजूत काढून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात दिले त्यावेळी तिचे आई-वडील आणि मामा उपस्थित होते

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page