
*मुंबई :* केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना’ (PMMSY) च्या धर्तीवर, आता लवकरच राज्यात ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ सुरू केली जाणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली. येत्या जानेवारी २०२६ पासून ही योजना सुरू होईल आणि त्यामुळे मच्छिमारांना केंद्र व राज्य या दोन्ही सरकारांच्या योजनांचा लाभ घेता येईल, असे त्यांनी सांगितले.
वरळी येथे शुभम चॅरिटेबल ट्रस्ट आणि भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात बोलताना मंत्री नितेश राणे यांनी हे महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, “या सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करत आहोत, ज्यामुळे राज्यातील प्रत्येक कोळी बांधवाला विविध पद्धतीने लाभ मिळण्यास सुरुवात होईल.”
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर