‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत १५०० तक्रारी दाखल; त्वरित कारवाई करण्याचे मंत्री लोढा यांचे आदेश

Spread the love

मुंबई-‘सरकार आपल्या दारी’ या राज्य सरकारच्या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रमात एकूण १५०० तक्रारी दाखल झाल्या आहेत. बुधवार १८ एप्रिल रोजी २०० अर्जदार महिलांनी आपल्या समस्या महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये मांडल्या. स्थानिक प्रशासनाने या तक्रारी पडताळून यावर तातडीने कार्यवाही करावी, ज्या महिलांना रोजगाराची आवश्यकता आहे त्यांना रोजगार मार्गदर्शन करावे तसेच निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ करून द्यावा अशा सूचना महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या आहेत.

ग्रँट रोड येथील मुंबई महापालिकेच्या डी वॉर्ड मध्ये सरकार आपल्या दारी उपक्रमांतर्गत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत मुंबई महानगपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशिष शर्मा, वीर माता तथा सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा गोरे, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त डॉ.अभिनव देशमुख, मुंबई महापालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता हसणाळे,डी वॉर्डचे सहायक आयुक्त शरद उघडे यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मंत्री मंगलप्रभा लोढा यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे “सशक्त नारी-समृद्ध भारत” हे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभागांतर्गत ‘सरकार आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. आलेल्या तक्रार अर्जावर १५ दिवसात सर्व विभागांनी कार्यवाही करावी.पावसाळ्यापूर्वी मुंबई उपनगर परिसर मधील स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्व कामे करावी. म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासबाबत महानगरपालिका आणि म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती पर कार्यशाळा आयोजित करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणचे अवैध धंदे याला आळा बसण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, जेणेकरून महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे शक्य होईल.

मंत्री लोढा पुढे बोलतांना म्हणाले, “वाहतूक समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शाळेत प्रवेश मिळत नाही, आरोग्य सुविधा देणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यावर कारवाई करावी, कचरा पेटीची व्यवस्था करणे, ड्रेनेज ची पाइप लाईन फुटली आहे अशा तक्रारी वर प्रत्येक स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करावी. काही सहकारी गृहनिर्माण संस्थांना मुंबई महानगर पालिकेकडून वेळेत पाणी मिळत नाही.आजूबाजूला असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था मोटार लावतात अशा गृहनिर्माण संस्थांवर कारवाई करावी.ज्या महिलांना रोजगार आवश्यकता आहे त्यांना रोजगार मार्गदर्शन करावे.”

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page