मायग्रेन……….अर्धशिशी आजाराची लक्षणे व त्यावरील उपाय

Spread the love

मायग्रेनचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. डोक्याच्या एका भागात होणा-या या वेदना खुप भयानक असतात. चक्कर येण्यापासुन तर उलट्या देखील होऊ शकता. तणाव, जास्त वेळ उपाशी राहणे अशी अनेक कारणे यामागे असू शकतात. दिर्घकाळ डोक्यात वेदना होण्याची समस्या असेल तर यावर दुर्लक्ष न करता याचे चेकअप केले पाहिजे.मानवी शरीराचा प्रत्येक अवयव, भाग महत्त्वाचा आहे. पण त्यातही डोक्याचा भाग खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्या शरीराच्या हालचाली नियंत्रित करण्याचं, त्यांना कार्यान्वित करण्याचं महत्त्वाचं काम होतं ते मेंदूकडूनच. त्यामुळे जेव्हा कधी डोक्याची एकच बाजू दुखू लागते किंवा कधी पूर्ण मस्तक जोरात ठणकू लागतं, तेव्हा माणूस अगदी हतबल होतो. अशा पद्धतीने खूप काळ ठणकणारं डोकं अर्धशिशीमुळे असू शकतं. सामान्य डोकेदुखीपेक्षा काहीसा गंभीर असा हा डोकेदुखीचा प्रकार. इतर आजारांप्रमाणे या आजाराची कोणतीही पूर्वलक्षणं यात आढळत नाहीत. त्याचप्रमाणे अर्धशिशी कशामुळे होते यामागचं ठाम शास्त्रीय कारण आजही कोणाला माहीत नाही. एकदा का रुग्णाचं डोकं दुखू लागलं की ते दोन तासांपासून ते बहात्तर तासांपर्यंत डोकं दुखत राहतं. या वेदना अचानकपणे सुरू होतात. काही जणांना अर्धशिशीचं दुखणं सुरूहोण्यापूर्वी डोकं जड वाटू लागतं. आजूबाजूच्या आवाजाचा, प्रकाशाचा त्रास होऊ लागतो. काहींना डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखं वाटतं. यालाच retinal migraine म्हणतात. काही वेळेला डोळ्यांच्या हालचालीत शिथिलता येते (opthalmic migraine), तर काही वेळेस हात आणि चेहरा हेसुद्धा निर्जीव, लकवा झाल्यासारखे वाटतात (hemiplegic migraine) मानसिक ताणामुळेही र्अध किंवा पूर्ण डोकं जोरात ठणकू लागतं.

अर्धशिशी सुरू होताना डोक्यातील रक्तवाहिन्या प्रमाणापेक्षा जास्त आकुंचन व प्रसरण पावतात. मज्जातंतूंच्या दाहामुळेही डोकं जोरात ठणकू लागतं. या डोकेदुखीचा पुढचा भाग म्हणजे रुग्णाला अर्धशिशीचा अ‍ॅटॅकही येऊ शकतो. जर या वेळेस त्या रुग्णाला वेळेत औषध मिळालं नाही तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या अभ्यासानुसार जगातील दहा टक्के लोक हे या आजाराने ग्रस्त आहेत. महिलांमधलं या आजाराचं प्रमाण सर्वात जास्त आहे.

अर्धशिशीचा अ‍ॅटॅक येण्याचीही काही कारणं आहेत. त्यापैकी महत्त्वाची कारणं म्हणजे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी होणा-या हार्मोन्स बदलामुळे, एखाद्या गोष्टीचा उग्र दर्प उदा. रंगाचा, अत्तराचा सुगंध, प्रकाशाची तीव्रता, चहा-कॉफीचे अति सेवन, अति तेलकट खाणं, अनियमित झोप, अति शारीरिक श्रम, कामाचा ताण, अति व्यायाम, ऋतुमानातील बदल यांमुळे अर्धशिशीचा त्रास वाढू शकतो.

त्यासाठी हे टाळा

SMOKE & DRINK 1>फार काळ उपाशी राहू नये.

तंबाखू, दारू, सिगारेट आदी व्यसनं टाळा.
अति विचार करू नका.
अति मांसाहार करू नका.
दही वर्ज्य करा.
उन्हात फिरणं टाळा.
छत्री किंवा टोपी घेतल्याशिवाय बाहेर पडू नका.
मानसिक संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. अति ताण टाळा.
स्ट्रेस हार्मोन्स (ताण वाढवणारे हार्मोन्स) वाढले तर त्यामुळेसुद्धा हा त्रास वाढतो.

आहार कसा असावा

आहार वेळेवर आणि हलका घ्या.
मेंदूला साखर (ग्लुकोज) पोहोचली पाहिजे. त्यासाठी उन्हाळ्यात खाण्यामध्ये गोडाचं प्रमाण थोडं तरीअसावं.
पाणी भरपूर प्या.
गोडं ताक, कोकम सरबत, आवळा सरबत यांचंही सेवन करा.
थंडीमध्ये भुकेचं प्रमाण जास्त असतं. तेव्हा न्याहारी जास्त घ्या.
गोड जिलेबी खा. त्यामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

घरगुती उपाय

स्वच्छ धुतलेल्या आल्याच्या छोट्या तुकड्यावर थोडं लिंबू पिळून चघळल्यास डोकेदुखीत आराम मिळतो.
अळशीच्या बिया भाजून, त्याची पूड बनवून त्यात चवीपुरतं मीठ घालून त्याचं २-४ चमचे चूर्ण नियमित दोन-तीन महिने घेतल्यास त्याने आराम मिळतो.
राईचे पोटीस डोक्याखाली, मानेवर लावल्यास त्यानेही बराच आराम मिळतो.
सुंठ, दालचिनीचे, वेलदोडय़ाचं तेल यांचाही वापर तुम्ही करू शकता.
सुंठ आणि जायफळ यांचा लेप डोक्याला लावल्यास त्यानेही आराम मिळतो.

अर्धशिशीसाठी गुणकारी योगासने

योगासनांमुळे शरीरात रक्ताभिसरण क्रिया अतिशय उत्तम प्रकारे होते. शरीरातील सगळ्याच बाहय आणि आंतरिक अवयवांचं मालिश होतं. >आंतरस्त्रावी ग्रंथी शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात. या आंतरस्रवी ग्रंथींचं कार्य बिघडल्यास व्यक्ती आजारी पडते. त्यामुळे या ग्रंथींचं कार्य बिघडलं असेल तर ते सुरळीत करण्याचं काम योगासने करतात.

ही योगासने करा

अर्धशिशीसाठी शशांकासन (चंद्रासन), अधोमुख श्वानासन, सुप्त भद्रासन, पाद हस्तासन, विपरीतकरणी मुद्रा, शीर्षासन, सर्वागासन (शीर्षासन करण्यास कठीण असलेल्यांना अत्यंत सुलभ असं सर्वागासन आहे.), मत्स्यासन तसेच नाडीशोधन प्राणायाम (अनुलोम विलोम), कपालभाती, भस्त्रिका, शीतली आणि शीतकारी हे प्राणायाम अत्यंत गुणकारी आहेत. मेंदूला जास्तीत जास्त रक्तपुरवठा त

सेच प्राणवायू (ऑक्सिजन) या योगासनांमुळे आणि प्राणायामामुळे मिळतो. त्यामुळे शांत आणि गाढ झोप लागते.

पण पूर्णपणे घरगुती उपायांवर अवलंबून राहणंही चुकीचं आहे. त्यासाठी जर वारंवार डोकं दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं कधीही सोयीस्कर. आपल्याला असणारी डोकेदुखी नक्की अर्धशिशीच आहे का, हे फक्त डॉक्टरच सांगू शकतात. उन्हाळा आता सुरू होईल. उन्हाळ्यात अर्धशिशीचा त्रास अधिक होतो. तेव्हा घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेऊन बाहेर पडा. शक्य असल्यास एखादं गोड चॉकलेट वा गोड पदार्थ जवळ ठेवा आणि आपली तब्येत सांभाळा.

परंतु अवेळी होणा-या या त्रासापासुन मुक्ती मिळवण्यासाठी याचे क्विक ट्रीटमेंट जाणुन घेणे खुप आवश्यक आहेत…

पुदीना
पुदीन्याचा अँटीृइन्फ्लेमेटरी गुण नसांना आराम पोहोचवण्याचे काम करते. या हर्बचा सुगंधच डोकेदुखीची अर्धी समस्या दुर करते. याच्या पानांचा वापर चहात करणे फायदेशीर असते. यामध्ये चवीसाठी मध मिळवता येऊ शकते.

अदरक
अद्रक खाल्ल्याने ब्लड वेसेल्समध्ये कोणत्याच प्रकारचा कॉन्ट्रॅक्शन होत नाही ज्यामुळे वेदनांची समस्या होत नाही. अद्रकची चहा प्या किंवा फक्त अद्रक खाल्ल्याने देखील फायदा होतो.

बर्फ
मायग्रेनच्या त्रासापासुन सुटका मिळवण्यासाठी आइस क्यूब्सचा वापर खुप फायदेशीर आहे. बर्फाचा तुकडा एका स्वच्छ कपड्यात घेऊन टॉवेलमध्ये गुंडाळून याने डोके शेका.

ज्यांना कामाचा ताण असतो , त्यांना मोठ्या प्रमाणात डोकेदुखी होते. ध्यानधारणा आणि प्राणायाम केल्याने या त्रासापासून बऱ्याच प्रमाणात मुक्ती मिळू शकते.

  1. काही पदार्थ असे आहेत ज्यामुळे डोकेदुखीपासून बराच आराम मिळतो. त्यात आल्याचं नाव सर्वात आधी घ्यावं लागेल. म्हणजे आल्याकडे आपण ‘ पेन रिलिव्हर ‘ म्हणून बघू शकतो. आल्याचा एक तुकडा घेऊन त्यावर थोडं लिंबू पिळा. चवीसाठी त्यावर थोडं काळं मीठ घाला आणि हलके चघळा. आलं चघळल्याने साधी डोकेदुखी थांबत असेल तर चिवट अर्धशिशीवरही नियंत्रण मिळवता येतं. आलं वेदना कमी करतं..

अर्धशिशीचा त्रास होत असेल तर -सुंठ अधिक जायफळ यांचा लेप भुवईच्या वर लावावा.

शिंक काढण्याच्या कोणत्याही उपायाने शिंक काढल्यासही अर्धशिशी कमी होते .

सकाळी उठल्या बरोबर पेढा खाल्ल्याने ती कमी होते.
अर्धशिशी पित्त व सर्दीमुळे होते. पेढयाने पित्त कमी होते व शिंक काढण्याने सर्दी मोकळी होते.

ज्यांचं वारंवार डोकं दुखतं अशांनी दोन ते चार टेबलस्पून आळशीच्या बियांची पूड नियमितपणे दोन-तीन महिने खावी. आळशीच्या बियांची पावडर बनवण्यासाठी आधी त्या कोरड्याच भाजाव्या. चवीसाठी त्यात मीठ मिसळा.

मीरे आणि साखर
सकाळी उठल्यावर मीरपुड आणि साखर पाण्यात टाका आणि याचे सरबत तयार करुन प्या. खुप परिणाम कारक उपाय आहे.

तुप
मायग्रेन दूर करण्याचा सर्वात सोपा फॉर्मूला म्हणजे तूप कोमट करुन नाकात टाकणे, यामुळे तात्काळ आराम मिळतो.

लसुन
लसुनची एक लहानशी पाकळी खाऊन अनेक रोगांवर उपचार केला जाऊ शकतो. याचा ज्यूस नाकात टाकल्याने आणि पेस्ट कानामागे लावल्याने मायग्रेनच्या वेदनांपासुन आराम मिळतो.

पुर्ण झोप घेणे
कमी झोपणे हे या आजाराचे सर्वात मोठे कारण असु शकते यामुळे बॉडीची अॅक्टीव्हिटी टिकवून ठेवण्यासाठी 7-8 तासांची झोप अवश्य घ्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page