एम.आय.डी.सी च्या पाणी बिल ग्राहकांना चुकीची माहिती  देऊन पाणीपुरवठा बंद करण्याची धमकी….

Spread the love

रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एम. आय. डी. सी. तील पाईपलाईन पाणी बिल ग्राहकांना मागील ३ ते ४ दिवसांपासून काही अज्ञात व्यक्तींमार्फत पाणी बिल भरण्यासंदर्भात चुकीची माहिती देऊन पाणीपुरवठा बंद करण्याची धमकी दिली जात असून ग्राहकांनी अशा फसवणूक करणाऱ्या संदेशांना कृपया प्रतिसाद देऊ नये वा त्यांच्याशी कोणतेही व्यवहार करु नये अशा आशयाचे अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक कार्यकारी अभियंता मऔविम, रत्नागिरी विभाग यांनी काढले आहे .

       
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,कार्यकारी अभियंता ,रत्नागिरी विभाग यांनी आज १३ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेले अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक पुढील प्रमाणे …

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
(महाराष्ट्र शासन अंगिकृत)
जा.क्र./का.अ./रत्ना/पी-२३१६४४/२०२५,
दिनांक : १३/०९/२०२५
अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक

सदर कळविण्यात येते की,

रत्नागिरी विभागातील सर्व MIDC पाईपलाईन पाणी बिल ग्राहकांना मागील ३ ते ४ दिवसांपासून काही अज्ञात व्यक्तींमार्फत फसवणूक करणारे संदेश प्रसारित होत आहेत. या संदेशांमध्ये पाणी बिल भरण्यासंदर्भात चुकीची माहिती देऊन पाणीपुरवठा बंद करण्याची धमकी दिली जात आहे.

ग्राहकांनी घेण्याची खबरदारी :

MIDC कडून अशा प्रकारचे संदेश प्रसारित केले जात नाहीत.
फसवणूक करणाऱ्या संदेशांना कृपया प्रतिसाद देऊ नये तसेच त्यामधील दुव्यावरून (links) कोणतेही व्यवहार करू नये.


कोणतेही संशयास्पद”.apk” फाइल्स डाउनलोड अथवा इन्स्टॉल करू नयेत.


अप्रमाणित दुवे (unverified links) उघडू नयेत,
अशा संदेशामुळे आपले यंत्र (device) खराब होऊ शकते किंवा आपली वैयक्तिक/आर्थिक माहिती चोरी होण्याची शक्यता असते.
      
पाणी बिलाबाबत कोणत्याही शंका असल्यास कृपया फक्त अधिकृत MIDC रत्नागिरी विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. सर्व ग्राहकांनी सतर्क रहावे व याची नोंद घेऊन सहकार्य करावे .

– कार्यकारी अभियंता मऔविम, रत्नागिरी विभाग .

प्रत : मा. मुख्य अभियंता मुंबई मऔविम, यांना माहितीसाठी सविनय सादर.

प्रत : मा. अधीक्षक अभियंता (को), मऔविम, पनवेल यांना माहितीसाठी सविनय सादर. प्रत : उपअभियंता (स्था)/(वि/यां)/सुविधा/कुडाळ मऔविम यांना माहितीसाठी.

प्रत : मा. अध्यक्ष, स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशन भुखंड क्र. पी-७६ मिरजोळे रत्नागिरी यांना माहितीसाठी. कृपया सर्व ग्राहकांना सदर बाबत अवगत करावे.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page