
देवरुख- देवरुख पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सामाजिक सलोखा समिती सदस्यांची पोलीस ठाणे येथे आज दि. 3/6/2025 रोजी 11.30 ते 12.30* या वेळात बैठक घेऊन *सामाजिक सलोखा समिती” ही संकल्पना पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांची असून सदर समिती स्थापना करण्यामागचा उद्देश समजावून सांगून उपस्थिततांना खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या.
पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात सामाजिक शांतता राहावी याकरिता सर्वधर्मीय प्रतिष्ठित व्यक्ती तसेच प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर यांचा या कमिटीमध्ये समावेश करण्यात आलेला असल्याचे सांगितले.

या कमिटीच्या माध्यमातून पोलीस ठाणे स्तरावर महत्त्वाच्या सणाचे पार्श्वभूमीवर मीटिंग घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकरिता प्रयत्न करण्यात येणार असून कमिटी सदस्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
सामाजिक सलोखा समिती सर्वसमावेशक असून या समितीच्या वतीने सर्व धर्मीय सण आनंदात साजरे होण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार असलेबाबत नमूद केले.
आगामी बकरी ईद सणाचे अनुषंगाने गौवंश हत्या तसेच गोमांस वाहतूक इत्यादी वरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकरिता स्थानिक पातळीवर बैठक घेऊन प्रयत्न करणे बाबत सांगितले.
आगामी सण उत्सव. – बकरी ईद अनुषंगाने सूचना.
संशयास्पद गोवंश वाहतूक अथवा गोमांस* वाहतूक याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाणे येथे कळविणे किंवा डायल ११२ येथे कळविण्यास सांगितले.
.
▪️गोवंश वाहतूक अथवा गोमांस विक्री/वाहतूक* करताना संशयित आढळल्यास त्यांना मारहाण न करता पोलीस ठाणे येथे कळविणे बाबत सांगितले.
.
गोवंश/गोमांस वाहतूक इत्यादी बाबत अफवा पसरवणारे व्हिडिओ छायाचित्र प्रसिद्ध* झाल्यास त्याबाबत बेकायदेशीर कृती न करता स्थानिक पोलीस स्टेशन येथे कळवणे बाबत सांगितले.
आगामी बकरी ईद सणाचे अनुषंगाने धार्मिक भावना दुखावतील अथवा सामाजिक तेढ निर्माण होईल अशी कृती अथवा वक्तव्य करू नये याबाबत सूचना दिल्या.
अशा विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
या बैठकीसाठी पोलीस निरीक्षक श्री महेश तोरसकर
व अमंलदार श्री सागर मुरुडकर यानी समिती सदस्याना संपर्क साधुन बैठक यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.