संगमेश्वर भाजपा कार्यालयात ज्येष्ठ नागरिक व विधानसभा कोअर समितीची बैठक संपन्न.

Spread the love

भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले मार्गदर्शन.

महाराष्ट्र प्रवक्ता न्यूज |देवरुख | सप्टेंबर १२, २०२३.

लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत महाविजय २०२४ अभियान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार, रत्नागिरी द. जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांच्या नेतृत्त्वात आज भाजपा कार्यालय देवरुख येथे ज्येष्ठ नागरिकांचे संमेलन संपन्न झाले. यानंतर लगेचच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील कोअर समिती सदस्यांची बैठक संपन्न झाली.

आगामी काळात ‘महाविजय २०२४’ हे एकच धोरण आणि एकच अभियान आपल्याला यशस्वी करायचे आहे. पंतप्रधानपदी आपले नेते मा. मोदीजींना पुन्हा एकदा विराजमान करायचे आहे. आणि यासाठी नव्यांसोबत जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांचे आशीर्वाद अभिप्रेत आहेत. आपण एका विचारांचे पाईक आहोत, “असतील तसे घ्या आणि हवे तसे घडवा.” हा विचार आपण फार पूर्वीपासून आचरणात आणत आहोत. याचमुळे आज कित्येक जण भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व मान्य करून देशाच्या सेवेसाठी रुजू झाले आहेत. असा कानमंत्र यावेळी लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी दिला.

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी योगदान देणाऱ्या कटीबद्ध कार्यकर्त्यांनाच यापुढे जबाबदार्‍या देण्यात येतील असे यावेळी जाहीर करण्यात आले. तसेच जबाबदारी आणि पदे मिळाली नाहीत म्हणून कोणीही नाराज न होता पक्षाचे कार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. सदर बैठकीसाठी भाजपाचे सर्व आजीमाजी पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला, युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page