
*रत्नागिरी:* भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची सोमवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत कोकणात महायुती म्हणून एकत्र लढण्याच्या दृष्टीने सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि ना. उदय सामंत या दोन वरीष्ठ नेत्यांमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र यांच्या रायगड निवासस्थानी पार पडली. या बैठकीमध्ये ठाणे आणि रायगड तसेच रत्नागिरी मधील विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आगामी ग्रामपंचायत, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली.