चेंबूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांनी अक्षय तृतीया च्या शुभदिनी माऊली थोरवे यांना मनसेच्या चेंबूर विधान सभेच्या विभाग अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देत पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या नियुक्ती पत्रात असे म्हटले आहे की पक्षाचे ध्येय धोरणे व कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी आपल्या संघटनेत निष्ठेने राबवावी व यामध्ये आपणाकडून कोणत्याही प्रकारची तडजोड व कुचराई स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
माऊली थोरवे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या सरचिटणीस पदी कार्यरत असताना पक्षाचे काम पक्षाचे कार्य अतिशय प्रामाणिकपणे केले थोरवे यांच्या या कार्याची दखल घेत व पुढील महानगरपालिका निवडणुक पाहता राज ठाकरे यांनी त्यांना मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी देत त्यांना चेंबूर विधानसभेच्या विभाग अध्यक्ष पदी त्यांची नेमणूक केली. महाराष्ट्र नवनर्माण सेनेच्या सर्व प्रभागातील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी त्यांना पुषपगुच्छ देऊन शुभेच्या दिल्या.