कडवई (प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मौजेअसुर्डे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी श्री मनोहर मुंडेकर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रुप ग्रामपंचायत मौजेअसुर्डे ची दिनांक १५ ऑगस्ट ची तहकूब सभा दिनांक ३१ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय मौजे असुर्डे येथे संपन्न झाली यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ मतदार बंधू भगिनी उपस्थित होते यावेळी नव्याने तंटामुक्त समिती नव्याने गठीत करावी असा विषय समोर आल्याने बहुसंख्य ग्रामस्थ बंधू भगिनी यांनी विद्यमान अध्यक्ष श्री मनोहर मुंडेकर यांच्या वरती विश्वास दाखवत आणि मनोहर मुंडेकर यांची कार्यपद्धत चांगली असल्याने त्यांचीच अध्यक्ष पदी फेर निवड करावी असा विषय बहुसंख्य ग्रामस्थांनी उचलून धरल्याने बहुमताच्या जोरावर श्री मनोहर मुंडेकर यांची अध्यक्ष पदी फेरनिवड करून समिती गठीत करण्यात आली.
श्री मनोहर मुंडेकर यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने सरपंच श्री प्रदीप शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले.व ग्रामस्थांना सोबत घेऊन श्री मनोहर मुंडेकर यांना पुढील कारकीर्द करीता मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.तसेच मनोहर मुंडेकर यांची अध्यक्ष पदी झालेली फेरनिवड यामुळे मौजे असुर्डे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.