उल्हासनगर (प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर – ३ मध्ये शाखा सुभाष नगर पंचशील बुद्ध विहारात बुधवार दि ७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यागमुती माता रमाई आंबेडकर यांची १२६ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपासक उपासिका यांना ठाणे जिल्हा संघटक राहुल इंगळे गुरुजी हे मार्गदर्शन करीत होते तसेच या जयंती प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका उपाध्यक्ष अशोक एफ शिरसाट, सचिव श्याम भिगादिवे, सुभाष नगर शाखेचे शशिकांत अडांगळे, माजी अध्यक्ष एफ ए शिरसाट, अंजनाताई सपकाळे, माधुरीताई खुरंगळे, बेबीताई थोरात, यांच्यासह आदी उपासक उपासिका यावेळी उपस्थित होते