गुहागर : गुहागर तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सुरू असलेले काळा दगड उत्खनन व खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करण्यात यावे तसेच ग्रामपंचायतीने दिलेला परवाना रद्द करून याबाबतचा ठराव तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात यावा, असा ठराव वरवेली ग्रामपंचायतीच्या विशेष गामसभेत एकमताने करण्यात आला. तसेच काळा दगड उत्खनन व खडी क्रशर बंद न झाल्यास जनआंदोन छेडण्याचा इशारा ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांनी दिला.
जाहिरात :