कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये; रत्नागिरी पोलीसांचे नागरिकांना आवाहन!…
रत्नागिरी:- पोलिसांनी दिलेल्या प्रेस नोट नुसार आज दि. ०२/०९/२०२४ रोजी विभागीय गस्ती दरम्यान ०२.३२ वा. चे दरम्यान रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या (Ratnagiri City Police Station) हद्दी मध्ये पेट्रोलिंग करिता असणाऱ्या सेकंड मोबाईल मधील पेट्रोलिंग अंमलदार यांना, मारुती मंदिर येथील असणाऱ्या “शिवसृष्टी” मधील मावळांच्या पुतळ्यांची एका इसमाने नुकसान केले आहे असे समजताच सेकंड मोबाईल मधील पेट्रोलिंग अंमलदार यांनी त्या इसमाला हटकले असता तो मारुती मंदिर (Maruti Mandir Ratnagiri) येथून एस. टि. स्टँड रोड च्या दिशेने पळून गेलेला होता.
या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याची सेकंड मोबाईल पेट्रोलिंग व सेक्टर अंमलदार यांच्या मदतीने आठवडा बाजार येथून त्या इसमास तत्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. सदर इसमा विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३३२/२०२४ सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ (१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे व सदर इसम नामे- संदेश गावडे वय-२४ हा रत्नागिरी शहारामधील रहिवासी असल्याचे प्राथमिक चौकशी मध्ये निष्पन्न झाले आहे तसेच या घटनेची अधिक चौकशी करण्यात येत आहे.
आरोपी संदेश गावडे वय-२४, रत्नागिरी यास आज दिनांक ०२/०९ /२०२४ रोजी मा. न्यायालयात पुढील कायदेशीर कार्यवाही करिता हजर करण्यात येत आहे. सदर घटेनेचे गांभीर्य लक्षात घेता रत्नागिरी पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये अथवा अफवांचे बळी पडू नये.