
संगमेश्वर प्रतिनिधी-आज दि. 21/06/2026 रोजी 8.00 ते 12.00 वा. या वेळात श्रीक्षेत्र मार्लेश्वर देवस्थान, मारळ या ठिकाणी 1) मार्लेश्वर देवस्थान स्वच्छता मोहीम
2) नैसर्गिक आपत्ती अनुषंगाने (मॉक ड्रिल)3) वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले. तसेच मार्लेश्वर देवस्थान येथील दुकानदार यांना स्वच्छतेच्या बाबतीत योग्यता सूचना देण्यात आल्या…
सदर कार्यक्रमाला तहसीलदार कार्यालय व इतर संस्थेचे सदस्य यांना सहभागी करून घेण्यात आलेले होते. श्री.गोताड, (तहसीलदार देवरुख.) व त्याचे कर्मचारी देवरुख पोलीस ठाणे – अधिकारी व पोलिस अंमलदार, राजू काकडे हेल्प अकॅडमी चे सदस्य – श्री.युयुत्सु आर्ते, श्री. जयवंत वाईरकर व इतर सदस्य. पोलीस पाटील,देवरुख पोलीस ठाणे श्री क्षेत्र मार्लेश्वर ट्रस्ट, मारळ व मारळ गावातील ग्रामस्थ रेएंट्री फाउंडेशन* सदस्य श्री.किशोर राक्षे. व त्याचे सदस्य. बार्टी संस्था,सदस्य श्री. आशिष कांबळे आधी संस्थेचे कार्यकर्ते व सदस्य कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला मारळ गावातील ग्रामस्थ व इतर संस्थेचे सदस्यांनी उस्फूर्त सहभाग घेतलेला होता. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, देवरुख पोलीस ठाणे.. (श्री. महेश तोरसकर, पोलीस निरीक्षक देवरुख पोलीस ठाणे. )पोलीस अंमलदार- सागर मुरुडकर यांनी केले होते.