
मुंबई (शांताराम गुडेकर/दिलीप तावडे )
आराधी गोंधळी पोतराज यांच्या मुंबई मंडळातर्फे आज आझाद मैदान येथे मोर्चा काढण्यात आला.आराधी गोंधळी पोतराज भजनी मंडळ. महाराष्ट्र यांच्यातर्फे लातूर एक्सप्रेसला श्री तुळजाभवानी लातूर एक्सप्रेस करण्यात यावे.सांस्कृतिक कलाकारांना मानधन मिळावे अशा मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.

मंडळच्या मागण्या आजवर पूर्ण झाल्या नाही.गेली अनेक वर्ष यासाठी मोर्चे काढण्यात आले पण अजून कोणत्याही सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही.तरीही आम्ही सतत पाठपुरावा सरकारकडे करत आलो आहोत.पण आमच्या मागण्याकडे कायम दुर्लक्ष केले आहे.आता नवीन सरकारने तरी आमच्या मागण्या मान्य कराव्या व समाजाला न्याय द्यावा म्हणून आम्ही मोर्चा काढत आहोत.असे मंडळाचे अध्यक्ष दिलीप वाघमारे यांनी बोलताना सांगितले.या मोर्च्यात मंडळ पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.