
जनशक्तीचा दबाव न्यूज | खेड | ऑक्टोबर ०८, २०२३.
गुहागर विधानसभा क्षेत्रातील खेड साखरगाव, ता. खेड येथे जय भवानी मित्रमंडळ आयोजित मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ भाजपा रत्नागिरी (उत्तर) ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष व प्रसिद्ध समाजसेवक श्री. संतोष जैतापकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर सर्व खेळाडूंना त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा युवा मोर्चा खेडचे तालुकाध्यक्ष सचिन चाळके, युवासेना खेड तालुकाप्रमुख सुरज रेवणे, माजी पोलिस आयुक्त अरविंद महापदी, सुभाष महापदी, दत्ता कदम, भाजपा ओबीसी मोर्चा खेडचे तालुकाध्यक्ष संकेत हुमणे, मुसाड उपसरपंच मानसिंग सुर्वे, सदानंद चांदे, सुरेश वाळंज, वसंत मोरे, विजय साळुंखे, संदिप विष्णू कदम, शिवाजीराव उतेकर, दिलीप उतेकर, प्रकाश उतेकर, शशिकांत उतेकर, मोहन जाधव, नितीन मोरे , पत्रकार शाहीर शाहिद खेरटकर, वैद्यकीय टीम प्रमुख दिनेश झगडे, मनोज डाफळे व १५ गावांतील ग्रामस्थ, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.