मराठमोळं मुलुंड आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या,कडधान्य व तृणधान्य (मिलेट) महोत्सवचे आजोजन..

Spread the love

मुंबई (शांताराम गुडेकर )
मराठमोळं मुलुंड आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या,कडधान्य व तृणधान्य (मिलेट) महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
पावसाळा सुरू झाला की रानभाज्या बाजारात येण्यास सुरूवात होते.जंगलातून आणलेल्या या रानभाज्या औषधी असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडते.रानभाज्या या दिवसांमध्ये कमी किमतीत उपलब्ध होतात.त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आवर्जुन त्यांची खरेदी करतात.रानभाज्या बाजारात मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत.त्यामुळे खवय्यांची तेथे खरेदीसाठी झुंबड दिसते.जंगली भाज्या औषधीसुद्धा असतात. तसेच पावसाळ्यापुर्वी इतर भाजीपाला महागलेला असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक या रानभाज्यांना पसंती देतात.डोंगराळ भागातील लोक शेवळी, लोत, कोळीभाजी, बाफली, दिंडे या सारख्या रानभाज्या बाजारात विकायला आणतात.
पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध भाज्यांची लज्जत व वेगवेगळी तृणधान्ये (मिलेट),कडधान्य सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यावर उपजीविका करणाऱ्या आदिवासी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागा बरोबर रानभाज्या व मिलेट महोत्सवाचे आयोजन केले आहे.मराठमोळं मुलुंड संस्थेने वर्ष २०२१ मध्ये प्रथमच रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते व त्यास मुलुंडकरांनी भरघोस प्रतिसाद दिला होता.
हा रान भाज्या महोत्सव मुलुंड हायस्कूल हॉल, युनियन बँक (जुनी- आन्ध्र बँकेच्या जवळ), चंदन बाग रोड, पाच रस्ता, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८० येथे २९ जुलै २०२३ रोजी (शनिवार) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत पी.एस. एन सपलाय चैन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड,अँड.संजय माळी( स्नेहा केटरर्स अँड डेकोरेटर्स ), लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड(मुलुंड – ई)यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला असल्याचे प्राची सोमण(सचिव- मराठमोळं मुलुंड)यांनी सांगितले.तरी मुलुंड मधील सर्वच नागरिकांना विनंती आहे की त्यांनी याही वर्षी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व आदिवासी बांधवांना या मंदीच्या दिवसात त्यांच्या उपजीविके करिता हातभार लावावा असे आवाहन आजोजाकांतर्फे करण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page