
रत्नागिरी (प्रतिनिधी) : ‘आय पॉपस्टार’ या संगीत रिअॅलिटी शोमधील मराठी स्पर्धक राधिका भिडे हिच्या आवाजाने सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
‘मन धावतंया तुझ्याच मागं, डोलतंया तुझ्याचसाठी…’ या पॉप गाण्याने रसिक प्रेक्षकांना प्रेमात पाडलं असून, तिच्या गोड आणि मोहक आवाजाने ती महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली आहे.
२४ वर्षांची राधिका ही ‘सा रे ग म प’ फेम प्रसिद्ध गायिका शमिका भिडेची लहान बहीण आहे. गायनाचा वारसा लाभलेल्या राधिकेने ‘आय पॉपस्टार’च्या स्टेजवर तिच्या आवाजासोबतच मराठमोळ्या लूकनेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. काळा ब्लाऊज, जांभळी नऊवारी, नथ, कपाळावर चंद्रकोर, सोन्याचे दागिने असा तिचा पारंपरिक मराठी लूक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.

तिने गायलेलं ‘मन धावतंया तुझ्याच मागं…’ हे अस्सल मराठी पॉप गाणं परीक्षकांनाही भारावून गेलं. शोमधील या परफॉर्मन्सनंतर राधिकाच्या आवाजावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रत्नागिरीची असलेली राधिका सध्या मुंबईत वास्तव्यास असून, तिने अजय-अतुल, श्रेया घोषाल यांसारख्या नामवंत कलाकारांच्या कॉन्सर्ट्समध्येही सहभाग घेतला आहे. एका गाण्यामुळे प्रचंड लोकप्रिय झालेल्या राधिकाच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली असून, अनेक चाहते तिच्या पुढील गाण्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*




