वरळी ; प्रतिनिधी ‘मराठी माणसा जागा हो!’ ने दुमदुमली वरळी मराठी भाषा जतन संवर्धन संरक्षण
आणि मराठी माणसाचा न्याय्य हक्क व रोजगारासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या वतीने वरळीमध्ये परप्रांतीयांच्या वाढत्या मुजोरीमुळे ‘मराठी माणसा जागा हो’ चा एलगार करण्यात आला. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेले
एकंदरीत राजकारण आणि परप्रांतीयांची मुजोरी पाहता मराठी माणसाच्या अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न तसेच मुंबईमधील मोठ मोठे व्यापार, उद्योगधंदे इतर राज्यात हलवले जात आहेत. खाजगी कंपन्यांमध्ये मराठी माणसाला डावलले जात आहे. मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात आहे. सद्याचे उत्तम उदाहरण म्हणजे CSTM बाहेरील सांगली जिल्ह्यातील शेतकरी तरुणांवर आलेला प्रसंग मराठी शिलेदार रवींद्र कुवेसकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस आणला आपण जर असेच गाफील राहिलो,तर पालिकेच्या मराठी शाळा बंद होतील यात दुमत असण्याचे कारण नाही. इतर राज्यांतून येणारे
लोंढे व त्यांची वाढती लोकसंख्या पाहता आणि बाहेरच्या लोकांची मुंबईत मोठी गुंतवणूक होत असल्यामुळे आपल्या सामान्य मराठी माणसाला मुंबईत हक्काचं घर घेणंदेखील परवडेनासं झालं आहे. त्यामुळे मुंबई सोडून त्याला मुंबई बाहेर जावे लागत आहे. मुंबईत घर घेण्याची क्षमता असलेल्या मराठी माणसाला परप्रांतीयांद्वारे घरं नाकारली जात आहेत.
परप्रांतीयांचे लोढे मुंबईत अनधिकृत झोपड्या बांधून दहा वर्षांनी आपल्याच महाराष्ट्र सरकारकडून फुकटची घरे पदरात पाडून घेत आणि सामान्य मराठी माणूस घरासाठी कर्ज काढून कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. आहेत मराठी माणसामध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या वतीने रविवारी वरळी येथे सांयकाळी जनजागृती फेरी काढून वरळी जांबोरी मैदान येथे समाप्ती करण्यात आली. या जनजागृती फेरीमध्ये बहुसंख्य प्रमाणात मराठी माणसाने एकत्र येऊन मराठीचा एलगार केला. संघटनेच्या वतीने यापूर्वी दादर, गिरगाव, लालबाग, परळ या मराठी बहुल परिसरात अशाच प्रकारची जनजागृती फेरी काढण्यात आली होती. यापुढे देखील असेच विभागावर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या ठिकाणच्या मराठी बहुल विभागांमध्ये जनजागृती करण्यातयेणार आहे असे संघटनेचे प्रमुख संघटक प्रमोद मसुरकर यांनी यावेळी सांगितले.
आज महाराष्ट्रातील सर्व मराठी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. कारणकित्येक अमराठी राजकारणी, धनदांडगे
मराठी नेत्यांना रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून आव्हान देत असल्यामुळे मराठी माणसाच्या तळपायाची आग
मस्तकात जात असल्याची भावना धर्मेंद्र घाग व रवींद्र कुवेसकर यांनी व्यक्त यांनी केली आहे. मराठी नेते जातीपातीचे
राजकारण करून आपल्याच मराठी माणसाच्या उरावर अमराठी भाषकांना बसवत असल्यामुळे पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा रहावा लागणार आहे असे मत ज्येष्ठ कामगार नेते लहू साळवी यांनी व्यक्त केले. आज महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाला पदोपदी हक्कासाठी आपल्याच महाराष्ट्रात संघर्ष करावा लागत असल्याने मराठी माणसा जागा हो’ ची हाक संघटनेचे कार्याध्यक्ष धर्मेंद्र घाग यांनी दिली. वरळीच्या या जनजागृती अभियानातमहाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह स्थानिक मराठी भाषकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
जाहिरात