मराठी हिंदी जेष्ठ साहित्यिक प्रा. दामोदर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न

Spread the love

ठाणे / कल्याण : माणसांचं मन हे अथांग आहे. त्यामध्ये सृजनाच्या अनेक शक्यता दडलेल्या आहेत. नव्या कवींनी कविता लेखना बरोबरच आपल्या मनाचे दार ठोठवावे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वात दडलेल्या सृजनाच्या विविध शक्यतांचा शोध घ्यावा. त्यात तुम्हाला कथाकार किंवा कादंबरीकार, चित्रकार किंवा छायाचित्रकार दडलेला दिसेल आणि तो संधीची वाट पहात असेल म्हणूनच अ. भा. मराठी साहित्य संमेलनात एक दिवस महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन भरवण्याची गरज आहे." असे प्रतिपादन मराठी हिंदी साहित्यिक प्रा. दामोदर मोरे यांनी केले. ठाण्याच्या नीलपुष्प साहित्य मंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. हा कार्यक्रम कल्याणच्या बुद्धभूमी सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

प्रा. मोरे पुढे म्हणाले की, ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने आयोजित अ.भा. मराठी साहित्य संमेलनात सर्वांच्या सहकार्याने मी हा प्रयोग यशस्वी केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयावर झालेल्या काव्य संमेलनात उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे लोककवी प्रा. प्रशांत मोरे, साहित्यिक डॉ. विठ्ठल शिंदे, साहित्यिक शिवा इंगोले, कवी डॉ. गंगाधर मेश्राम, कवी गिरीश लटके यांनी मोरे यांच्या विषय गौरवोउद्गार काढले आणि आपल्या उत्कृष्ठ कविता सादर केल्या. एकूण पन्नास कवींनी या काव्यासंमेलनात सहभाग घेतला. विषयानुरूप दर्जेदार कविता सादर करून प्रा. दामोदर मोरे यांना कवितेने वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या. नंदा कोकाटे, शशिकला कुंभार, नवनाथ रणखांबे, अश्विनी देशपांडे, किर्ती खांडे, सृष्टी गुजराथी, मोहसीना पठाण, राजरत्न राजगुरू, जगदेव भटू, शाम बैसाने, विजयकुमार भोईर, अॅड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे, नरेश जाधव,सुरेखा गायकवाड इ. कवितांचे छान सादरीकरण झाले.

यावेळी एबीएम समाजप्रबोधन संस्थेचे संस्थापक सिताराम गायकवाड, आरपीआय (ए) चे जेष्ठ नेते सुरेश सावंत यांनी प्रा. दामोदर मोरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्याना शुभेच्छा देऊन सत्कार केला. प्रा. दामोदर मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाहत्यांनी त्यांचा शाल, बुके, भेटवस्तू देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रास्ताविक आणि आभार (उपाध्यक्ष निलपुष्प साहित्य मंडळ,ठाणे ) नंदा कोकाटे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ रणखांबे यांनी केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page