
पुणे: तळेगाव MIDC पो स्टे हद्दीत एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे मराठी सिने अभिनेता रवींद्र हनुमंत महाजनी (वय ७७ वर्षे) बंद फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळून आले आहेत. ते गेले ७- ८ महिन्यापासून वरील ठिकाणी एकटेच राहण्यास होते. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा गश्मिर यांना कळविण्यात आली असून ते तळेगाव येथे आल्यानंतर मृतदेहाचे पोस्ट मोर्टेम करून घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
देखणेपण, रुबाबदार, दमदार अभिनयाच्या बळावर अभिनेते महाजनी यांनी १९७५ ते १९९० चा काळ गाजवला. ‘मुंबईचा फौजदार’, ‘झुंज’, ‘कळत नकळत’, ‘आराम हराम’ अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका सुपरहिट झाल्या. मराठीतील या एव्हरग्रीन अभिनेत्याने त्याच्या करिअरची सुरुवात चक्क टॅक्सी चालवून केली होती. अभिनय क्षेत्रात येणाऱ्या पूर्वी रवींद्र महाजनी एक टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांनी जवळपास ३ वर्ष त्यांनी मुंबईत टॅक्सी चालवली. पण, त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देईना.
त्यामुळे ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत. आणि, रात्री टॅक्सी चालवत.