
*देवरुख दि ५ जून-* चक्रभेदी सोशल फाउंडेशन संस्था ही विधवा आणि एकल महिलांसोबत तसेच पर्यावरण या विषयावर काम करणारी संस्था आहॆ.
आतापर्यंत निराधार,विधवा व एकल महिलांसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी चक्रभेदी संस्था नेहमीच तत्पर आहे सध्या त्यांना “मायेचं, हक्काचं घर”केंद्र स्थापन करून प्रत्येकीच्या हाताला काम देणे चालू आहॆ. विधवा महिलांचे हळदी कुंकू, शिव्या मुक्त समाज अभियान, टी स्टॉल शॉप मोफत देणे, शेअरिंग केअरिंग इ. नावीन्य पूर्ण उपक्रम संस्था राबवत आहॆ. विधवा व एकल महिलांना समाजात मानसन्मान मिळावा व त्या आर्थिक सक्षम व्हाव्यात यासाठी संस्था अथक परिश्रम घेत आहे या कार्यात जोडले जाण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनेक महिला उत्सुक आहेत. यामध्ये मनीषा बागणीकर या पुण्यामध्ये तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे त्यांचे शिक्षण सिव्हिल इंजिनिअर असून त्यांना सामाजिक कार्याचा गाढा अनुभव आहे एकूणच त्यांचे व्यक्तिमत्व व सामाजिक कार्याची तळमळ पाहून चक्रभेदी सोशल फाउंडेशन ने त्यांची पुण्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. याबद्दल त्यांच्यावर महाराष्ट्र राज्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सदर प्रसंगी सारिका कांबळे, विशाखा कांबळे, मनोहर मनोहर पगारे, दिग्विजय बागणीकर तसेच साने गुरुजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मीना काटे उपस्थित होत्या.