▪️देवरुख:- पुर्ये येथील कथित अंगणवाडी इमारत घोटाळ्यात गटविकास अधिकारी देवरुख यांच्या चौकशी अहवालात तत्कालिन सरपंच तसेच अंगणवाडी सेविका; तत्कालिन ग्रामसेवक व प्रकल्प अधिकरी याना दोषी ठरवले असुन त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी मंगेश गोरुले यानी निवेदनाद्वारे केली आहे.
*श्री गोरुले यानी हे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालय कोंकण भवन येथे दिले असुन या निवेदनात म्हटले आहे की….*
▪️”मु पो पुर्ये (जांभवाडी) ता संगमेश्वर जि रत्नागिरी या कार्यक्षेत्रातील अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या ७/१२ ला व असेसमेंटला नोंद असलेली मिळकत नंबर २३४ सन १९९५/९६ हि इमारत कोणत्याही शासकीय विभागाची परवानगी न घेता ती स्वत: नष्ट करुन त्याच ठिकाणी अंगण वाडी सेविकेने खाजगी घर बांधले आहे”
*निवेदनात श्री गोरुले यानी पुढे म्हटले आहे की…*
*“सदर प्रकरणाच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर अनेक ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केलेले असुन तक्रारदाराच्या अनुषंगाने गट विकास अधिकारी पंचायत समिती संगमेश्वर (देवरुख) श्री नरेंद्र रेवडकर (१/११/२०२१) यानी केलेल्या चौकशीत अंगणवाडी सेविका दर्शना सुरेश ठाकर; तत्कालिन सरपंच श्रीमती रोहिणी सुभाष चव्हाण; शंकर राघो गोरुले; तात्कालिन ग्रामसेवक श्री रमेश धोंडु चाळके; बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना यादव याना दोषी ठरवुन कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत”*
▪️या अहवालाचा आधार घेवुन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी मंगेश गोरुले यानी केली आहे.