
जळगाव – 19 ऑक्टोबर : अवैधरीत्या १ लाख १८ हजार २०२.१५८ ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह ६ शेतजमीन मालकांना १३७ कोटींवर दंडाची नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. या धडक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
सातोड (मुक्ताईनगर) येथील एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह सहा जमीनमालकांना मुक्ताईनगर तहसीलदारांनी ६ ऑक्टोबर रोजी या नोटिसा बजाविल्या आहेत. त्यानुसार अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य २६ कोटी १ लाख १२ हजार ११७ इतके आहे. यापोटी पाच पटींनी दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.