
दापोली- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आयोजित आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव ‘मयूरपंख २०२५’ मध्ये कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पावलणच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक प्रकारांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली येथे आयोजित ‘मयूरपंख २०२५’ या सांस्कृतिक कार्यक्रमात या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी “भारतीय लोकनृत्य” या प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला.यासोबतच ललित कलांमध्येही विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश मिळवले. कोलॅज मेकिंग या प्रकारामध्ये कु. श्रावणी कदम हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच, पोस्टर मेकिंग या प्रकारामध्ये कु. पियुष सलोखे आणि क्ले मॉडेलिंग या प्रकारात कु. जतीन पाटणकर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढवला. भारतीय लोकनृत्य प्रकारात कु. प्रीती पेरवी, कु. लावण्या पांढरे, कु. श्रावणी भिसे, कु. देवयानी गुरव, कु. तेजल भिंगारदेवे, कु. दीक्षा कांबळे, कु. श्रावणी कदम, कु. प्राजक्ता कुंभार व कु. साक्षी कदम या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
या विद्यार्थ्यांच्या यशासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक प्रशांत इंगवले, प्राध्यापिका सिद्धी फरांदे, प्राध्यापिका सिद्धि नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*








