लातूर | पत्नीच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी २९ वर्षीय तरुणाला अटक केली. या व्यक्तीचे नाव रेहान खान असे आहे. आरोपीची २४ वर्षीय पत्नी यशोदा खाटीक ही धारावी येथील त्यांच्या राहत्या घराच्या टेरेसवर लटकलेल्या अवस्थेत आढळली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी रेहान खानला अटक केली. मृतदेहाचे पोस्टमार्टम केल्यानंतर रेहान खानला ताब्यात घेण्यात आले. पोस्टमार्टम मध्ये महिलेचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे स्पष्ट झाले.
मध्य प्रदेशातील कटनी येथील असलेल्या यशोदा खाटीक चा कुटुंबियाने असा दावा केला आहे की ती 2018 मध्ये रेहान खान सोबत पळून गेली आणि त्यानंतर लग्न करून लातूर राहायला गेली. यशोदा च्या कुटुंबीयांचा आरोप आहे की रेहानने तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर रेहानने तिला बळजबरीने यशोदा नाव बदलून रुबीना ठेवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
रेहान खान दारूच्या नशेत यशोदावर अत्याचार करत असे, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यशोदाच्या कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान पत्नीच्या हत्त्येप्रकरणी रेहान खानवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.