शिवसेना संघटनेने जो विश्वास दाखवून माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती सचोटीने पार पाडण्यास मी प्रयत्नशील…
वि.कार्यकारी संपादकीय ; महाराष्ट्र
राज्याचे मुख्यमंत्री मा.नाम.श्री.एकनाथजी शिंदेसाहेब, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री मा.नाम.श्री.उदयजी सामंतसाहेब, सिंधुरत्न योजना-सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे उपाध्यक्ष मा.श्री.किरणजी उर्फ भैय्याशेठ सामंत, जिल्हाप्रमुख मा.श्री.राहूल पंडित यांच्या आदेशानुसार माझी शिवसेना तालुकाप्रमुख लांजा पदी नियुक्ती झाली. तीन वेळा लांजा ग्रा.पं.सदस्य, लांजा नं. 5 चे मॉडेल स्कूल म्हणून लोकवर्गणीतून केलेली भव्य उभारणी, लांजा महोत्सवसह विविध स्पर्धांचे करत असलेले आयोजन आदिंसह हिंदूह्दयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले 80 टक्के समाजकारणाचा वसा घेऊन काम करण्याचे आदेश देऊन, माझ्यावर दाखविलेल्या विश्वासास पात्र ठरण्याजोगे काम, सर्वांना विश्वासात घेऊन मी करणार आहे. मा.नाम.श्री.उदयजी सामंत व मा.श्री.किरणजी उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या माध्यमातून, लांजा तालुक्यात सुरु झालेले "लांजा तालुका संपर्क कार्यालय" हे लांजा तालुक्यातील जनतेला विविध शासकिय-वैयक्तिक व विकासकामांसाठी "आपले हक्काचे कार्यालय" वाटत असून, दिवसेंदिवस कार्यालयामध्ये लांजा तालुक्यातील जनतेचा ओघ वाढत आहे. लांजा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम मा.नाम.श्री उदयजी सामंत, मा.श्री. किरणजी उर्फ भैय्याशेठ सामंत, तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून मी करत आहे. मा.नाम.श्री.उदयजी सामंत आणि मा.श्री.किरणजी उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे यामुळे लांजा तालुक्यात शिवसेनेचा झंझावत सुरु झाला असून, "गाव तेथे शाखा", सभासद नोंदणी, शिवदूत नेमणुक, यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
जाहिरात