घरच्या घरी बनवा; हॉटेलसारखी स्वादिष्ट पावभाजी, लगेच नोट करा रेसिपी

Spread the love

पाव भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडते.अनेक जण वीकेंड आला की घराबाहेर पडतात आणि बाहेरची पावभाजी आवडीने खातात. आज आम्ही तुम्हाला पावभाजी घरी कशी बनवायची, हे सांगणार आहोत.

साहित्य

  • कांदा
  • टोमॅटो
  • फ्लॉवर
  • बटाटा
  • वाटाणे
  • शिमला मिरची
  • आलं लसणाची पेस्ट
  • लाल मिरची पावडर
  • पावभाजी मसाला
  • कोथिंबीर
  • तेल
  • तूप
  • मीठ
  • कृती
  • बारीक चिरलेली शिमला मिरची, टोमॅटो, फ्लॉवर आणि बटाटा घ्या. त्यात वाटाणे टाका.
  • कुकरमध्ये थोडं तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात या सर्व भाज्या टाका. या भाज्या तेलामध्ये परतून घ्याव्यात.
  • त्यानंतर त्यात पाणी टाका आणि कुकरमध्ये सर्व भाज्या मध्यम आचेवर तीन शिट्ट्या होईपर्यंत चांगले शिजवून घ्या.
  • शिजलेल्या भाज्या रईने एकजीव करुन बारीक पेस्ट करुन घ्या.
  • एका कढईत तेल घ्या
  • तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा.
  • कांदा चांगला परतून घ्यावा
  • त्यात आलं लसणाची पेस्ट टाका. त्यात लाल मिरची पावडर टाका
  • त्यानंतर त्यात पावभाजी मसाला टाका.
  • हे सर्व मसाले चांगले परतून घ्या आणि त्यात थोडे पाणी घाला.
  • मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात पेस्ट केलेल्या भाज्या टाका आणि एकजीव करा.
  • भाजी जास्त घट्ट होऊ नये म्हणून प्रमाणानुसार पाणी घाला.
  • त्यात चवीनुसार मीठ आणि तूप घाला
  • पाच मिनिटे पावभाजी शिजू द्या
  • गरमा गरम पावभाजीवर कोथिंबीर घाला आणि गरमा गरम पावबरोबर ही भाजी सर्व्ह करा

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page