संगमेश्वर | ऑगस्ट १६, २०२४- भूमी अभिलेख देवरुख यांच्या यांनी जमिनीचे खोटे नकाशे वापरून श्री भोसले व तत्कालीन अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने हवेच्या नकाशात दुरुस्ती केली होती व त्यासाठी खोटे नकाशे बनवण्यात आले होते. गेली दोन वर्ष पाठपुरावाई करून कोणतीही कारवाई होत नसल्याने मकरंद सुर्वे यांनी 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचे ठरवले होते. त्यावरती उपाधीक्षक देवरुख श्री भागवत यांनी कागदपत्राचे फाळणी करून वस्तुस्थितीची दखल घेत महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 258 अन्वये भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे तात्काळ अहवाल सादर करण्यात आला आहे. 15 ऑगस्ट रोजी श्री भागवत यांनी मकरंद सुर्वे यांच्यासमोर सदरचा अहवाल अधीक्षक भूमि अभिलेख चे भागवत यांच्याकडे सुपूर्द केला आहे. अधीक्षक भूमि अभिलेख रत्नागिरी यांच्याकडून सदर अहवालावर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन व दुरुस्ती करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच उपाधीक्षक भूमि अभिलेख भागवत यांनी सदर विषयांमध्ये स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे.
उपअधीक्षक भूमि अभिलेख देवरुख यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर व सकारात्मक भूमिकेमुळे मकरंद सुर्वे यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले आहे. सकारात्मक कारवाई केल्याबद्दल मकरंद सुर्वे यांनी अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी व उपाध्यक्ष भूमि अभिलेख देवरुख यांचे आभार मानले आहेत. योग्य कारवाई पुढील पंधरा ते वीस दिवसात त होईल असा विश्वास आहे. परंतु योग्य कारवाई न झाल्यास आपण परत आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे सद्यस्थितीला सकारात्मक भूमिकेमुळे माझे आंदोलन मी स्थगित करत आहे असे मकरंद सुर्वे यांनी सांगितले.