
*मुंबई-* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असे विधान करून हे वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी महेश कोठारेंवर निशाणा साधत ते नक्की मराठीच आहेत ना? असा सवाल केला आहे. तात्या विंचू रात्री येऊन तुमचा गळा आवळेल, असा खोचक टोलाही राऊतांनी यावेळी कोठारेंना हाणला.
महेश कोठारे यांनी भाजपच्या मागाठाणे येथील दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. ते मी मोदी भक्त असल्याचे म्हणाले होते. तसेच मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. भाजप म्हणजे आपले घर आहे. कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्त आहे. आपल्याला इथून नगरसेवक निवडून द्यायचा आहे.
विशेषतः यावेळचा महापौरही येथूनच निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल. मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हणालो होतो की, तुम्ही खासदार नव्हे तर मंत्री निवडून देत आहात. आताही या विभागातून नगरसेवक नव्हे तर महापौर निवडला जाईल, असे महेश कोठारे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची मराठी सिनेसृष्टीसह राजकारणात खमंग चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
*तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिले नाहीत..*
महेश कोठारे हे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही असे काही बोलला तर तात्या विंचू तुम्हाला चावेल. रात्री येऊन तुमचा गळा दाबेल, असे संजय राऊत मंगळवारी आपल्या नियमित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
*महेश कोठारेंनी एकनाथ शिंदे यांचेही केले होते कौतुक…*
उल्लेखनीय बाब म्हणजे महेश कोठारे यांनी अंबरनाथ येथे धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराच्या लोकार्पण सोहळ्यातही सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले होते. आपल्या सर्वांचे लाडके, धडाकेबाज नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमचा झपाटलेला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून साकार झालेला हा रंगमंच पाहून मी भारावून गेलो आहे. तुम्ही कलाकाराला इथे स्थान दिले. हे पाहून आम्ही खूप खूश झालो आहोत.
इथे कलाकारांचे पेंटिंग्स बघून मी भारावून गेलो. श्रीकांतजी, तुम्ही कायम झपाटलेले राहा आणि एकनाथजी, तुम्ही जे काम करता ते धडाकेबाज पद्धतीनेच करता. या नाट्यमंदिराचे उद्धाटनही खूप दणक्यात केले आहे. मी यापूर्वी असे कधीच पाहिले नव्हते. आम्हा कलावंतांसाठी तुम्ही खूप काही कराल, अशी अपेक्षा महेश कोठारे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली होती.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*



