कर्जत विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत ….महेंद्र थोरवे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
कर्जत : सुमित क्षिरसागर- राज्यात महायुती आणि महविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळत आहे. नुकतेच कर्जत विधानसभा मतदार संघातून आमदार महेंद्र थोरवे यांनी अर्ज दाखल केला आहे.
महेंद्र थोरवे यांचा रॅलीला प्रचंड गर्दी
महेंद्र थोरवे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हजारो कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेत आपला जल्लोष ढोल ताशांच्या गजरात महेंद्र थोरवे यांना पाठिंबा दर्शविला आहे. सामान्य कार्यकर्ता ते आमदार पण कोणताही बडेजाव नाही. साधी राहणी लोकांच्यात वावरणारे आणि कर्जत चां विकासचा महामेरू अस व्यक्तिमत्व म्हणून आमदार महेंद्र थोरवे सामान्य लोकांन मध्ये परिचित आहेत. अर्ज दाखल करताना यूवा वर्ग, महिला, ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थित कर्जत खालापूर शिवसेनेच्या वतीने कर्जत मध्यवर्ती कार्यालय येथुन निघालेली रॅली कर्जत शहरातून फिरुन प्रांत अधिकारी कार्यालय येथे पोचली. तत्पूर्वी आमदार महेंद्र थोरवे यांनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आमदार महेंद्र थोरवे लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने मोठे योगदान देत आहेत.
आमदार महेंद्र थोरवे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मतदार संघात केलेल्या कामांचा आणि कार्याचा गौरव संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला आहे. लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा आणि दांडगा जनसंपर्क असलेले सर्व समाजाचे प्रतिनिधी म्हणून आमदार थोरवे यांच्याकडे पाहिले जाते. सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आमदार महेंद्र थोरवे लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने मोठे योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. यावेळीही मोठा विजय असावा अशी संपूर्ण मतदारसंघातील जनतेची इच्छा आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते आणि सर्व समाजातील नागरिक सज्ज झाल्याचे स्पष्ट चित्र आज अर्ज दाखल करताना दिसत आहे.