
मुंबई- आयपीएलच्या यंदाच्या सिझनचा अंतिम सामना नुकताच पार पडला. गुजरात टायटन्सस विरूद्ध चेन्नई सुपरकिंग हा अंतिम सामना पाहण्यासाठी संपूर्ण देशभरातील क्रिकेट प्रेमी काल टिव्हीसमोर बसले होते. काल रात्री उशीरापर्यंत हा सामना चालला. रविवारी नियोजित असलेला हा सामना पावसामुळे सोमवारी होणार असल्याचं सांगण्यात आलं.मात्र,सोमवारीही पावसाचा जोर कायम असल्याने या सामन्याला उशीर झाला.अखेर ११ नंतर या सामन्याला सुरूवात झाली आणि मंगळवारी मध्यरात्री २ वाजता या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करत चेन्नई सुपरकिंगने हा सामना जिंकला.
दरम्यान, हा सामना संपल्यानंतर चेन्नईसुपर किंगचा कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनी याने मोठी घोषणा केली आहे.निवृत्तीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना,मला असे वाटते की मी निवृत्त होण्याची हिच ती योग्य वेळ आहे,मला आजपर्यंत प्रेक्षकांचे,चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले आहे.त्यांच्यासोबत माझे नाते खूप वेगळे आहे. दरम्यान पुढील ९ महिने मेहनत घेऊन पुढच्या आयपीएल सीजनमध्ये खेळण्यासाठी पुन्हा येणं ही माझ्यासाठी कठीण बाब आहे. पण मला ही गोष्ट माझ्या चाहत्यांसाठी करायची आहे, असं धोनीनं म्हणताच मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षकांनी धोनी-धोनी नावाचा गजर सुरू केला.
‘माझ्या शारिरीक स्वास्थ्यावर, फिटनेसवरही हे अवलंबून असेल. हे ठरवण्यासाठी माझ्याकडे ६ ते ७ महिने आहेत. मला वाटतं हे माझ्याकडून माझ्या चाहत्यांसाठी एक प्रकारचं गिफ्ट असेल. हे माझ्यासाठी फार कठीण असणार आहे. पण चाहत्यांनी मला दिलेलं प्रेम पाहाता हे माझं त्यांच्यासाठी गिफ्ट असेल. ही अशी गोष्ट आहे, जी मला माझ्या चाहत्यांसाठी करायची आहे’, असं धोनी म्हणाला.